धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना चांदसर ता. धरणगाव येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर ता. धरणगाव येथे सदर अल्पवयीन मुलगी आपल्या परिवासासोबत राहते. दि. २४/०१/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेच्या सुमारास सदर मुलगी तिच्या परिवारासोबत झोपलेली होती. आरोपी सागर छगन कोळी (वय २९, व्यवसाय मजुरी, रा. कोळी वाडा चांदसर ता.धरणगाव) याने तिचा हात पकडून तोंड दाबुन “तु माझ्या घरी चल” असे बोलून तिची छेडछाड केली. याआधी देखील छेडछेड प्रकरणी सागर कोळीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी सागर छगन कोळी यास न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पाहेकॉ अर्जुन कुवारे, पोउपनिरी मधुकर उंबर हे करीत आहे.