Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»धरणगावजवळ पुन्हा बसचा भीषण अपघात
    अपघात

    धरणगावजवळ पुन्हा बसचा भीषण अपघात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 14, 2024Updated:December 14, 2024No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राज्यात जणू काही बस अपघाताचे सत्रच सुरु आहे.  आज पहाटे चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी बस ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

    धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानंतर 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

    या भीषण अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून एक जण जागीच ठार तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

     

    जखमी झालेले प्रवासी 

    जाकीर शब्बीर खाटीक (वय-३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय-६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय-२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय ४५), शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळ्यात), रमेश सोनू मराठी (वय-७५), कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५, वरुड), प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय-३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय-७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय-५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) असे प्रवासी जखमी झालेले आहेत.

    दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षण पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतल्याचे दिसून आले.

     

    Bus Accident Dharangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून

    June 11, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif