Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»धानोरा ते पिराणा पदयात्रेला उत्साहात प्रारंभ!
    अध्यात्म

    धानोरा ते पिराणा पदयात्रेला उत्साहात प्रारंभ!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा ता. चोपडा

    येथून प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. धानोरा येथून सुरू झालेली ही पदयात्रा यंदा 17 व्या वर्षात प्रवेश करत असून 5 मार्च ते 19 मार्च या कालावधीत चालणार आहे.

    पदयात्रेचा शुभारंभ परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन व धर्मध्वज पूजन करून करण्यात आला. परमात्म्याकडे स्वतः पायी चालत जाणे ही श्रद्धेची भावना मनात ठेवून धानोरा तसेच परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी या पदयात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्व समाजातील स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी तसेच अबालवृद्ध अशा सुमारे 60 भाविकांचा या पदयात्रेत समावेश आहे.

    या पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते. श्रद्धेने सतपंथी भक्त ‘निष्कलंकी नारायण’चा नामघोष करत, सत्संगाचा लाभ घेत आणि सतपंथ परंपरेचा प्रसार करत पिराणा येथे पोहोचतात. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2009 पासून या पदयात्रेची परंपरा सुरू आहे. सुरुवातीच्या काळात ही पदयात्रा सुरत ते प्रेरणापीठ पिराणा अशी पाच वर्षे काढण्यात आली होती. त्यानंतर धानोरा येथून पदयात्रेची सुरुवात करण्यात येत असून दरवर्षी भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.

    या पदयात्रेत मार्गातील मुक्कामस्थळांवरून अनेक भाविक सहभागी होत जात असल्याने यात्रेचे स्वरूप अधिक व्यापक होत जाते. पदयात्रेदरम्यान दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती, प्रभाती पूजा तसेच हंसतेजजी महाराजांचा सत्संग आयोजित केला जातो. मार्गातील अनेक गावांतील भाविक पदयात्रींसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करतात.

    फैजपुर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपूर, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, डेडियापाडा, राजपीपला आदी भागांतील भाविक या पदयात्रेत सहभागी होत असल्याने यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध) दिवशी पिराणा येथे या पदयात्रेची पूर्णाहुती होते. त्या वेळी सर्व सतपंथी भाविक एकत्र जमतात. पिराणा येथील गादीपती परमपूज्य जगतगुरू सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज यांचे मार्गदर्शनपर संबोधन होते. त्यामध्ये उपासना मार्ग, कळसपूजा, ज्योतवारी यज्ञ तसेच सतपंथातील शंभर क्रियांची माहिती दिली जाते. व्यसनमुक्ती, उपासना-भक्ती आणि सद्गुरू हंसतेजजी महाराजांचे ज्ञान भजनांच्या माध्यमातून सांगितले जाते.

    याप्रसंगी परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, सर्व मुखी महाराज, सतपंथ ज्योत मंदिरचे अध्यक्ष व संचालक मंडळ, ईश्वर मुखी, कमलाकर मुखी, कशेरलाल मुखी, सतपंथ ज्योत मंदिर सेवक धनराज चौधरी, सतपंथ ज्योत मंदिर धानोरा ट्रस्टी, फैजपुर संस्थानचे कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘जातीभेद गाडून हिंदू म्हणून संघटित व्हा!’

    April 3, 2026

    महाराष्ट्रातील जनता आणि मराठ्यांची मागितली माफी!

    April 2, 2026

    “महाराणी ताराराणी जैन धर्माच्या; औरंगजेबाला मारण्यासाठी…”

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.