Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»महावितरणच्या नाकर्तेपणामुळे धानोरा परिसर अंधारात!
    जळगाव जिल्हा

    महावितरणच्या नाकर्तेपणामुळे धानोरा परिसर अंधारात!

    30 तासांपासून वीज खंडित : नागरिकांसह व्यापाऱ्यांचा तीव्र संताप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 25, 2026No Comments157 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    परिसरात महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. रविवार दि. 24 मे रोजी दुपारी आलेल्या अवकाळी वादळानंतर धानोरा गावासह परिसरातील अनेक भागांतील वीजपुरवठा तब्बल 30 तासांहून अधिक काळ पूर्णपणे खंडित राहिल्याने ग्रामस्थ, शेतकरी, लहान व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे ही समस्या केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, परिसरात दररोज दिवसातून 35 ते 40 वेळा वीज खंडित होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महावितरणविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

    परिसरात विजेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रभावी दखल घेतली जात नाही. शासनाचे नियम असतानाही संबंधित अधिकारी गावात मुख्यालयी राहत नसल्याने तक्रारींना प्रतिसाद मिळत नाही. कनिष्ठ कर्मचारी देखील ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तासन्‌तास संपर्क होऊ शकत नसल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढत आहे. परिसरात कोणताही तांत्रिक बिघाड झाला तरी तो दुरुस्त करण्यासाठी स्थानिक स्तरावर आवश्यक साहित्य किंवा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फॉल्ट शोधण्यासाठी आणि साहित्य आणण्यासाठी तब्बल 25 ते 30 किलोमीटर अंतर कापत चोपडा शहरापर्यंत जावे लागत आहे. या प्रक्रियेत अनेक तास वाया जात असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास मोठा विलंब होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत असून पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन व्यवहारांपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे.

    सततच्या वीज खंडिततेचा सर्वाधिक फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग व्यवसाय, दुग्ध व्यवसाय तसेच पाण्याच्या मोटारींवर अवलंबून असलेले नागरिक पूर्णपणे अडचणीत आले आहेत. अनेक लहान उद्योगधंदे बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच महावितरणची यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आताच केवळ मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला आणि 30-30 तास वीज गायब होत असेल, तर प्रत्यक्ष पावसाळ्यात परिस्थिती किती भयानक होईल? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे विजेवरील उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.

    स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी महावितरणकडे तातडीने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. 30 तासांपासून खंडित असलेला वीजपुरवठा अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने युद्धपातळीवर सुरळीत करावा, दिवसातून 40 वेळा होणारे ट्रिपिंग तात्काळ थांबवावे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावातच मुक्कामी राहून सेवा द्यावी तसेच पावसाळ्यापूर्वी संपूर्ण परिसरातील वीजवाहिन्यांची दुरुस्ती आणि देखभाल पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    केवळ एका तासाच्या वादळाने महावितरणची यंत्रणा भुईसपाट झाली आहे. अधिकारी गावात नसतात आणि कर्मचारी फोन उचलत नाहीत. आमचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. महावितरणने हा ढिसाळ कारभार त्वरित न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

    – दीपक साळुंखे,
    सामाजिक कार्यकर्ते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif