धानोऱ्याजवळ महामार्गावर अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
यावल (चिचोली) : धानोरा रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चिचोली येथील तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धानोरा गावाजवळील यश हॉटेलजवळ घडली.
चिचोली येथील सुनील पंडरीनाथ कोळी (पाटील) हे आपल्या डिस्कवर (एमएच १९, एडब्ल्यू २८६७) दुचाकीने धानोरा गावाकडे जात असताना, मागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच १८, बोगी ९८५०) धडक दिली. या भीषण अपघातात सुनील कोळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला.
अपघातानंतर सुनील कोळी यांना तातडीने धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिस तपास सुरूया घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.