धानोरा विद्यालयाची क्रीडा चषकात हॅट्रिक
भुसावळात झाल्यात खासदार चषक स्पर्धा
धानोरा, ता. चोपडाभुसावळ झालेल्या खासदार चषक क्रीडा स्पर्धेत खोखो खेळात येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्यूनियर कॉलेज विद्यालयाने विजयी व उपविजयी क्रीडा चषकांची हॅट्रिक साधली.
विद्यालयाच्या 17 वर्ष मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजयी चषक पटकविला. 19 वर्षा आतील मुलांचा व 19 वर्षा आतील मुलींच्या संघाने देखील उपविजेतेपद पटकाविले व दोन चषक शाळेसाठी जिंकले. केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते धानोरा विद्यालय शालेय समिती सदस्य सागर चौधरी, क्रीडा शिक्षक देविदास महाजन, विजयी व उपविजयी तिघा संघातील खेळाडूंना सन्मानाने चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विजयी व उपविजयी तिघा संघांना क्रीडाशिक्षक व क्रीडाविभाग प्रमुख देविदास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती ज्येष्ठ संचालक बी.एस. महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, व्हि.सी. पाटील, अनिल महाजन, प्राचार्य के.एन. जमादार, उपमुख्याध्यापक एस. पी. महाजन, पर्यवेक्षक एल.डी. पाटील याच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मान्यवरांनी धानोरा विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

