मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येमुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह काही जणांनी लावून धरले आहे. हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचे मान्य करत स्पष्टीकरण दिले आहे.
सुरेश धस काय म्हणाले ?
माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थान भेट झाली. त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यामुळे परवा भेटलो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत अजून काही नवीन घडामोडी होणार आहे. त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याच्या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले, मी त्यांचा राजीनामा मागितला नाही. त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहे. त्यांचा राजीनामा घेणे, न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे. पुढील एक दिवसांत आणखी काही नवीन मी सांगणार आहे. त्यावेळी तुम्हाला आणखी काही कळेल, असे धस यांनी म्हटले.