Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»धनंजय मुंडे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री, त्यामुळे…
    राजकारण

    धनंजय मुंडे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री, त्यामुळे…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीत जोर धरला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधकांचा दबाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मला अतिशय आनंद होत आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन याठिकाणी आपण केलेलं आहे. हे जे साहित्य संमेलन होतंय, जगभरातील मराठी माणसाकरिता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचे हे साहित्य संमेलन होतंय. या साहित्य संमेलनाकरिता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते. जवळपास ७० लोक या ठिकाणी दिवस-रात्र काम करत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    मुरलीअण्णा मोहोळ हे आपले कार्यवाह म्हणून जी काही मदत आहे त्या ठिकाणी ती मदत करत आहेत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालंच पाहिजे. या दृष्टीने आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत. देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरिता होकार दिलेला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    अतिशय भव्य अशा प्रकराचं साहित्य संमेलन होत आहे. विशेषतः मराठी भाषेला अभिजात जातीचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबाबत खूप उत्सुकता आहे आणि विचारप्रवरतनाचा काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी साहित्य संमेलनाबाबत म्हणाले.

    पहिली गोष्ट म्हणजे ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही त्याआधी कॅबिनेटमध्ये काम वैगेरे सगळं आमची भेट झाली होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहे त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधीही भेटू शकतात नी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनामा संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे.

    #politics Devendra Fadnavis Dhananjay Munde Resignation Santosh Deshmukh Murder Case Valmik Karad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif