Wednesday, August 17, 2022

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं आणि अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे गंभीर आरोप

- Advertisement -

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना करुणा मुंडे म्हणाल्या की, जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचे सांगत धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.

करुणा मुंडे म्हणाल्या की, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे”. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

तसेच करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. “धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला. पुढे त्यांनी म्हटलं की, “त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही”.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या