धामणगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेस प्रारंभ

0

धामणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धामणगाव येथे सरपंच गोकुळ सपकाळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांचे उपस्थित लाभार्थीस जंतनाशक गोळी देऊन जंतनाशक मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणण्यासाठी व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात दिनांक २५ एप्रिल ते २ मे दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व ता. आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जात आहे.

प्रा. आ. केंद्र धामणगाव कार्यक्षेत्रात विदगाव, उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी व सावखेडा बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले व डॉ. अजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, आरोग्य पर्यवेक्षिका प्रतिभा चौधरी हे मोहीम राबवित आहेत.

आज जंतनाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण ३४१९ मुला- मुलींना अंगणवाडी, प्रा. शाळा, विद्यालय व महाविद्यालयात जंतनाशक गोळ्या समक्ष खाऊ घालण्यात आल्या.

ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना मापअप राऊंड दि. २९ एप्रिल रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आव्हान डॉ. अजय सपकाळ यांनी केले आहे.

जंतनाशक कार्यक्रमाच्या आरोग्य पथकात डॉ. अश्विनी विसावे, डॉ. वृषाली पवार, डॉ. राहुल बनसोडे, प्रिया मंडावरे, व्ही. टी. महाजन, महेश वाणी, निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, राहुल लाडवंजारी, पंकज तायडे, चंद्रकला साठे, बबीता करोसिया, जयश्री कंखरे, अश्विनी धनराळे व नज्जो पठाण, दीपक कोळी, सुनील कोळी, मयूर पाटील, राजू सपकाळे, संगीता घेर व आशा सेविका कविता सपकाळे अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आदी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.