खुशखबर ! पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाखापर्यंतचं कर्ज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis government) महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी याबाबतची माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने DG लोन (DG loan) ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

DG लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार आता पोलिसांना 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना 15 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

DG लोन योजना काय?

DG लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज 20 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध केलं जातं. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.