धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अद्याप सावरणे कठीण झाले असून यात नवी भर म्हणजे आता शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं हा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोचला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे. धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग करेल. दोन्ही बाजूंचे दावे निवडणुक आयोगाकडे आहेत. आमचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.