नाशिक येथून अंखड ज्योत घेऊन गावाकडे प्रस्थान

शक्तीपिठ सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरातून पेटलेली ज्योत आणून सतत तेवत ठेवण्याची परंपरा

0

 

मनवेल ता. यावल

नवरात्री उत्सवा दरम्यान नऊ दिवस देवीचा जागर करत असतांना नवरात्रीच्या स्थापने अगोदर नाशिक येथील शक्तीपिठ सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरातून पेटलेली ज्योत आणून ती तेवत ठेवण्याची परंपरा साकळी येथील तरुण भक्त रुजवित आहे. त्यामुळे या धार्मिक व अध्यात्मिक परंपरेला एक वेगळी अशी धार्मिक व अध्यात्मिक ओळख निर्माण झालेली आहे.

 

साकळी येथील देशप्रेमी दुर्गात्सव मंडळ व लोधी वाड्यातील महाराणा प्रताप मंडळ काही तरुण भक्त गावात नवरात्री उत्सवाकरिता अखंड ज्योत घेण्यासाठी सोमवारी नाशिक येथे पोहोचले. त्या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन देवीच्या गाभाऱ्यातून विधिवत अखंड ज्योत प्रज्वलित केली. यावेळी सर्व भावी भक्तांनी आई सप्तश्रुगी मातेच्या उदो.. उदो.. ‘च्या गजर केला. देवीचे मनोभावे दर्शन घेतले व पेटलेली ज्योत घेऊन साकळी गावाकडे मार्गक्रमण निघाले आहे.

 

पहिल्या माळेला साकळी गावात पोहचणार

कुलस्वामिनी श्री सप्तश्रुगी देवी ही महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होत असते. साकळी येथील देश प्रेमी दुर्गात्सव मंडळ व लोधी वाड्यातील महाराणा प्रताप मंडळाचे कार्यकर्ते व भाविक जवळपास २५० किलो मीटर अंतर पायी चालत पेटती अंखड ज्योत घेऊन दि. ३ ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला साकळी गावात पोहचणार आहे. या अखंड ज्योत पदयात्रेला नूतन विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते शामकांत वसंतराव महाजन तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ. सुनील पाटील व गावातील इतर नागरिकांनी मनोभावे निरोप दिला.

 

या धार्मिक उपक्रमात संतोष महाजन, प्रवीण महाजन, अरुण भोई, मनोहर परदेशी, महेंद्र बोरसे, नामदेव माळी, हर्षल बाविस्कर, गौतम महाजन, पुरणसिंग लोधी, राजेश लोधी, सचिन माळी, गोविंदा माळी, सुनील भोई, गोलू कोळी, नारायण कंडारे, विशाल लोधी, दिनेश लोधी, अतुल लोधी, आबा ठाकूर, उमेश माळी, निलेश माळी, युवराज माळी, देश प्रेमी मित्र मंडळ व महाराणा प्रताप मित्र मंडळ सहभागी झाले आहे.

 

भक्तांमध्ये  चैतन्याचे वातावरण 

नवरात्र महोत्सवात देशभरातून श्री सप्तश्रुगी मातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. नवरात्रीत ही ज्योत कुलस्वामिनीपासून नेण्याची महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तगण धावत येत असतात. हीच परंपरा साकळी येथील देवीभक्त यंदापासून मनोभावे करीत आहे. नाशिक येथील श्री सप्तश्रुगी देवीचे मंदिर ते साकळी २५० की. मी. अंतर तीन दिवसात भक्तगण पोहचार आहे. हे भक्त दररोज जवळपास ६० ते ७० किमी चालणार आहे. पायी ज्योत घेऊन धावणाऱ्यांमध्ये देवीभक्तांची निवड करतांना त्यांची प्रकृतीही पाहिली जाते. तो ज्योत घेऊन चालतांना प्रत्येकाला जास्तीतजास्त त्याला पाच किलोमीटर मर्यादा आखून देतात. या दरम्यान त्याला सावकाश धावायला सांगतात. चालतांना दम लागला, त्रास झाला तर त्याला आराम दिला जातो. पुढच्या तरुणाच्या हाती ज्योत दिली जात आहे. या धार्मिक उपक्रमामुळे सर्व भक्तांमध्ये धार्मिकतेचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे दिसून येत आहे.

 

देश प्रेमी दुर्गाउत्सव मंडळाचे भाविक कार्यकर्ते गेल्या आठ ते दहा वर्षापासून शिरागड येथून अखंड ज्योत आणत होते. यंदा नाशिक इथून अखंड ज्योत आणण्याचा संकल्प दोघे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला होता तो संकल्प पूर्णत्वास येत आहे. देवी शक्तिपीठ नाशिकच्या कुलस्वामिनी देवस्थानापासून अखंड ज्योत आणत असताना पायी नाशिक ते साकळी असा जवळपास २५० किलोमीटरचा लांब पल्ला पायी चालताना प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये एक वेगळीच सात्विकता व धर्मभाव निर्माण होत असतो. ज्योत घेऊन चालत असताना देवी माता एक वेगळीच शक्ती भक्तांना प्रदान करीत असल्याची प्रचिती येत आहे.

 

अखंड ज्योत पदयात्रेमुळे शरीराला एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होऊन मन प्रसन्न होत आहे. अशी भावना मंडळाचे कार्यकर्ते जेष्ठ संतोष महाजन यांनी अखंड ज्योत पदयात्रेतून बोलतांना व्यक्त केली. या पदयात्रेदरम्यान सर्व भाविक कार्यकर्ते एकमेकाची काळजी घेत असून सर्व कामकाज शिस्तीच्या मार्गाने करीत आहे. त्याचप्रमाणे या पदयात्रेत साकळी येथील आई एकविरा केर्टरचे संचालक नामदेव माळी व निलेश माळी या दोघांनी आपल्या मालकीचे दोन चार चाकी वाहने मोफत उपलब्ध करून दिलेली असून सर्व भाविक भक्तांसाठी दोघं वेळच्या जेवणाची व्यवस्था करून देत आहे. ही या पदयात्रेतील विशेष कौतुकाची बाब ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.