देवेंद्र फडणवीस उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ? हे काय नवीन..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) भाजपच्या (BJP) पाठींब्याने शिंदे गटाने (Shinde Group) सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सर्वानी पाहिलं.. मग देवेंद्र फडणवीस हे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री (fadnavis deputy chief minister of uttar pradesh) हे ऐकून तर तुम्हाला धक्काच बसला असेल. हा सर्व गोंधळ गुगलमुळे (Google) झालाय.

कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आपण सहज गुगलचा वापर करतो. पण, ती माहिती खरी असेलच याची खात्री आता केली पाहिजे. कारण, गुगलवर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्च केले असता उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश असा उल्लेखच आढळून आला आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये फडणवीस यांचा फोटो आणि त्याखाली पद लिहिले आहे. पण, ते उपमुख्यमंत्री उत्तरप्रदेश असा उल्लेख आहे. आता फडणवीस हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, मग उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री कधी झाले, असा प्रश्न उपस्थितीत झाला.

याच प्रोफाईल खाली फडणवीस यांची विकिपीडिया आहे, यामध्ये मात्र ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय ? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. विकिपीडिया शक्यतो कुणीही अपडेट करू शकतो. पण, एवढ्या मोठ्या सर्च इंजिनवर एका व्यक्तीचे पद कसे चुकू शकते, जी राज्याची उपमुख्यमंत्रिपदी विराजमान आहे. याआधीही गुगलकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.