देवेंद्र फडणवीस १० तास मुंबईबाहेर, तर्कवितर्कांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील मंत्री आणि आमदारांनी बंड पुकारला आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे.  दरम्यान विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील सागर या बंगल्यावरून एकटेच बाहेर पडले. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

फडणवीस मागील दोन दिवसात त्यांनी दिल्लीलाही जाऊन आले आहेत. तसेच, राज्यात सत्तास्थापनेसाठी बैठका झाल्या. त्यामुळे भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईबाहेरच होते. पहाटे ते सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.

फडणवीस सुमारे १० तास मुंबईबाहेर होते. फडणवीस कोणाला भेटले, याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली. यामुळे त्यांनी कोणाची घेतली भेट हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिंदे गटाच्या नावे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थितीही लावली. सध्या भाजप नेत्यांशी चर्चेला सुरुवात झाली. आज शिवसेनेची कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे आज भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.