Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान !
    राजकारण

    देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 15, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसून आल्याचे नेते सांगतात. राज्यातील लाडक्या बहिणींसह पक्षातील लाडक्या बहिणींना देखील आता महायुती स्थान दिले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 20 महिला आमदार विजयी झाल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे.

    राज्यात लाडकी बहीण योजना आणली. त्याचा लाभ सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणावर झाला. आता विधानसभेमध्ये निवडून आलेल्या महिला आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. महायुतीतील जवळपास चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तर भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. याआधी पंकजा मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिले आहे.

    मंत्रिमंडळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी महायुती सरकार भर देत आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती. त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

     

    भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार

    भाजपच्या सर्वात जास्त (14) महिला उमेदवार विजयी झाल्या आहे, 10 महिला आमदार या फेरनिवडून आलेल्या आहेत. यामध्ये श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (कैज) यांचा समावेश आहे. तर श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) या भाजपच्या चार नवीन महिला आमदार विजयी झाल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदार – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला आमदार झाल्या आहेत. तर विरोधी पक्षात काँग्रेसच्या उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

    cm devendra fadanvis Ladki Bahin
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट

    July 20, 2026

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif