भगवा रंग, सोनेरी काठ अन्‌ फडणवीसांच्या फेट्याचा थाट !

मुख्यमंत्रिपदाचे संकेत : सर्वांचेच वेधले लक्ष

0

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. यानंतर आता अखेर हे स्पष्ट झालं आहे की राज्याचे नवे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर विधानभवनात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झीली. या बैछकीत भाजपचे 132 आमदार उपस्थित होते. तिथे, गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.

भाजपचे संपूर्ण 132 आमदार आज विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. तिथेच ही बैठक पार पडली, जिथे आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. याला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं आणि फडणवीसांची एकमुखाने गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र, फडणवीस यांचीच निवड होणार याचे संकेत या बैठकीपूर्वीच मिळाले होते.

विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी सर्व 132 आमदारांना भगवे फेटे बांधण्यात आले. सर्व आमदारांना एकसारखे फेटे बांधण्यात आले होते. भगव्या रंगाचा हा फेटा होता ज्याला सोनेरी रंगाची बारीक काठ होती. तर, तुऱ्यालाही सोनेरी रंगाची बारीक काठ होती. हे सर्व आमदार सेंट्रल हॉलमध्ये बसून वरिष्ठ नेत्यांच्या येण्याची प्रतिक्षा करत होते. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यावर जेव्हा इतर नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलकडे निघाले तेव्हा त्यांच्याही डोक्यावर फेटा बांधलेला होता. पण, हा फेटा इतर आमदारांच्या फेट्यापेक्षा खूप वेगळा होता.

फडणवीसांना जो फेटा बांधण्यात आला होता, तो अत्यंत आकर्षक होता. रंग जरी सारखा असला तरी तो फेटा इतरांपेक्षा वेगळा होता. जिथे इतर आमदारांचे फेटे हे भगव्या रंगाचे आणि बारीक सोनेरी काठाचे होते. तिथे फडणवीसांच्या फेट्याला मात्र मोठी सुवर्ण काठ होती. त्यांचा तुराही अत्यंत आकर्षक दिसत होता. फडणवीसांच्या फेट्याला मोठी सुवर्ण काठ होती आणि त्याला हिरव्या रंगाची बारीक काठ होती. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप वेगळे दिसत होते. फडणवीसांनी प्रवेश घेताच तेच मुख्यमंत्री होणार याचे संकेत त्यांच्या या शानदार फेट्याने दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.