नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही. पण फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. फडणवीसांच्या कार्यालयाकडूनच त्याचे नाव पाससाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होणार याची शक्यता आणखी वाढली आहे.
नागपुरच्या रामनगरमध्ये चहाचा स्टॉल लावणारे गोपाळ बावनकुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना फडणवीसांच्या कार्यालयाकडून शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. आझाद मैदानात 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यामुळे बावनकुळेंना आकाश ठेंगणे झाले आहे. फडणवीसांनी आठवणीने आमंत्रण दिल्याने ते