Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात
    आरोग्य

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    नेस्ले कंपनीच्या आरएसपी उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2026No Comments77 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमळनेर येथील पिंगळवाडे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आज मौखिक आरोग्य, दंत चिकित्सा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामविकासात रचनात्मक कार्य करताना आरोग्याला प्रथम स्थान आहे. प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक आजार गंभीर रूप धारण करतात. हे ओळखून पिंगळवाडे गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी मौखिक आरोग्य जनजागृती, दंत तपासणी व उपचार कार्यक्रम राबविण्यात आला.

    मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून दंत तपासणी करून पालकांना उपचारासंदर्भात सल्ला देण्यात आला. योग्य वयातच मुलांची जडणघडण होत असते, त्यात शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करण्यात आले. मुलांना दात स्वच्छ करण्याची चांगली सवय लागावी म्हणून मोफत टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आले. या शिबिरात आश्रमशाळेतील 289 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना दात घासण्याचे योग्य प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरानंतर सर्व विद्यार्थ्यांना टूथब्रश व पेस्ट किटचे वाटप करण्यात आले.

    याप्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, माजी सरपंच मंगलाबाई बाळासाहेब देशमुख, माजी उपसरपंच समाधान पारधी, ग्रा. पं. सदस्य अतुल पाटील, भास्कर पाटील, उपमुख्यध्यापक दिपक राणे, विजय पाटील, शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले.  शिबिर यशस्वीतेसाठी जैन फार्म फ्रेश फुड चे राहुल चव्हाण, गांधी रिसर्च फौंडेशन चे विक्रम अस्वार यांनी सहकार्य केले. हा उपक्रम नेस्ले कंपनी च्या आरएसपी प्रकल्प, जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

    November 4, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif