न्हावी येथील वाचनालयास जमीन दान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क    
फैजपूर – न्हावी ता. यावल येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास कै.मिठाराम वेडू झोपे व कै. चांगुणाबाई बुधो झोपे यांच्या स्मरणार्थ येथील रहिवासी ( ह.मु. चाळीसगाव ) श्रीमती रेखा मिठाराम झोपे, डॉ. नरेंद्र मिठाराम झोपे व सचिन मिठाराम झोपे या परिवाराने श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास जागेचे दानपत्र करून दिले. एवढेच नाही तर सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्यांनी त्यांची जागा श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या नावाने हस्तांतरित करून दिली.नंतर त्यांनी प्रत्यक्ष न्हावी येथील वाचनालयास भेट देऊन वाचनालयाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. प्रसंगी मान्यवरांचा वाचनालयाकडून शाल ,श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी जागेचे दानपत्र वाचनालयाचे चेअरमन व संचालक मंडळाकडे सुपूर्त केले.
दान पत्र दिल्यानंतर सत्काराला उत्तर देताना डॉ. नरेंद्र झोपे म्हणाले ग्रामीण भागातील युवकांमध्ये वाचन संस्कृती जिवंत राहावी आणि वाचन संस्कृत जिवंत राहण्याचे काम श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय त्यांच्या मार्फत व्हावे यासाठी ही जागा झोपे परिवाराकडून वाचनालयास दान देण्यात येत आहे. यावेळी वाचनालयाचे चेअरमन हेमकांत गाजरे, संचालक प्रवीण वारके, नितीन चौधरी, मिलिंद बेंडाळे, गंगाराम वाघुळदे, ललित फिरके, ग्रंथपाल ललित इंगळे उपग्रंथपाल सौ.कविता इंगळे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार वाचनालयाचे सचिव युवराज तळेले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.