Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»थकीत पगार मागितला अन् मालकाने ठेचून संपवला
    गुन्हे वार्ता

    थकीत पगार मागितला अन् मालकाने ठेचून संपवला

    उचंदा शिवारात हॉटेल मालकाकडून मजुराचा खून
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 4, 2026No Comments357 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर

    थकीत पगाराची मागणी केल्याचा राग मनात धरून हॉटेल मालकाने मजुराच्या डोक्यात लाकडी काठीने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर-बुऱ्हानपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली. या प्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. मृत मजुराचे नाव गोकुळ तारासिंग जाधव (वय 55, मूळ रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुऱ्हानपूर, ह.मु. पुर्णाड शिवार) असे आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ जाधव हे पुर्णाड फाट्यावरील शेर-ए-पंजाब हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-बुऱ्हानपूर महामार्गालगत उचंदा शिवारातील एकनाथ पाटील यांच्या शेताजवळील सिटिझन गॅरेज परिसरात त्यांनी हॉटेल मालक कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याकडे थकीत पगाराची मागणी केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

    संतापलेल्या कमलजितसिंग याने लाकडी काठीने गोकुळ जाधव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृताच्या पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय 55) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif