चंद्रपूर शहरातील सदोष वाहतूक सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी
वाहतूक पोलीस आणि नागरिकांना ठरतेय डोकेदुखी
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूर शहरातील सदोष वाहतूक सिग्नलमुळे वाहतूक पोलीस आणि नागरिक यांची डोकेदुखी वाढली असून हे सदोष वाहतूक सिग्नल त्वरित दुरुस्त करण्यात यावे असे विनंतीवजा पत्र चंद्रपूर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी नुकतेच चंद्रपूर महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
चंद्रपूर शहरातील अनेक चौकातील सिग्नल सदोष आहेत. नियमानुसार नागरिकांना सिग्नल पार करताना जेवढा कालावधी न मिळता कमी मिळतो. त्यामुळे वाहनधारक मध्येच अडकतात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात वादविवाद होतात. तर कधी ग्रीन सिग्नल लवकरच संपत असल्याने वाहनधारक वाहन काढण्यासाठी घाई करतात. या घाईत एका वाहनाची दुसऱ्या वाहनाला स्पर्श होऊन किंवा धडक बसून वाहनधारक -वाहनधारकांमध्येच वादविवाद होतात.
या सर्व गोष्टींचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेने चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र पाठवून सदोष सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रानुसार, चंद्रपूर शहरातील बऱ्याचशा नागरीकांची सिग्नल दोषबाबत तक्रार येत आहे श. चंद्रपूर शहरातील कार्यरत सिग्नल मध्ये हिरवा लाईट लागल्यानंतर जो जाण्यासाठीचा कालावधी २० सेकंदाचा आहे, तो पार करण्यासाठी देणे आवश्यक त्यानंतर पिवळा लाईटचे अलर्ट करण्यासाठी ३ ते ५ सेकंद राहील. परंतु आपले शहरातील ग्रिन सिग्नल २० सेकदांचा असेल तर त्यांना १७ सेकंद त्याना दिले जातात.
कधी कधी हिरवा लाईट लागतो कधी लागत नाही. त्याला ०३ सेकंदा मध्ये काहीच दाखवत नाही व रेड लाईट होवुन जातो. त्यामुळे वाहतुक कर्मचारी यांना वाहनधारकावर कारवाई करताना फार मोठी अडचण होत आहे. तसेच सामान्य नागरिकांना जो मिळणारा वेळ आहे, त्याकरीता कमी होवुन जातो. त्याच्यामुळे चालान करताना लोकांशी वादविवाद होत आहेत. वाहन धारकांची पण गैरसोय होत आहे. त्याकरीता चंद्रपुर शहरातील कार्यरत सिग्नल यंत्रणेचा दोष तात्काळ दुर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.