नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असून आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला आहे.
आतिशी यांनी कालकाजी येथून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला आतिशी भाजपच्या रमेश बिधुरी यांच्या मागे होत्या पण शेवटी त्यांनी बाजी मारली. आतिशी यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
तर दुसरीकडे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा देखील पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पराभवानंतर सत्येंद्र जैन यांचा देखील पराभव झाल्याने आपला तिसरा मोठा धक्का बसला आहे. शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघातून आपचे सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे.
तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार प्रवेश वर्मा यांनी बाजी मारली . केजरीवाल यांचा 3181 मतांनी पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, प्रवेश वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे मुख्यमंत्री राहिले आहेत, तर संदीप दीक्षित हे दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.