उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा- दीपाली सय्यद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर शिंदे गटाच्या (Shinde group) वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर वक्तव्य केलं आहे.

दीपाली सय्यद म्हणाल्या की, मी ज्या प्रकारे शिंदे गटात प्रवेश करणार आहे, तसे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करावा. शिंदे गटातील प्रवेशाबाबत विचारणा केली असता दीपाली सय्यद यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या दीपाली सय्यद सध्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. याबाबत मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. मात्र त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सय्यद म्हणाल्या की, शिंदे गटात प्रवेश करण्याची तारीख ठरली होती. ती सध्या पुढे गेली आहे. लवकरच माझा प्रवेश होईल. भाजपचा (BJP) नकार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आहे. मी ज्या प्रकारे शिंदे गटात प्रवेश करणार आहे, त्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा. माझ्या मंचावर उद्धव ठाकरे उपस्थित असतील, अशी इच्छा दीपाली सय्यद यांनी बोलून दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.