Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद
    ताज्या बातम्या

    दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2026No Comments483 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई

    जळगाव : शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीने शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या दीपक गरुड यांना धुळे जिल्ह्यातील बिजासणी घाटातून अटक केली. यावेळी त्यांना आसरा देणाऱ्या तिघांविरुद्ध नाशिक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या तपासात गरुड यांच्या शिक्षण संस्थेचे आर्थिक व्यवहार दीपक गरुड बघत होते. त्यांच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे प्रस्तावही सादर झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तपासासाठी दीपक गरुड यांचा ताबा घेण्यासाठी पथक त्यांच्या मागावर होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढला. दीपक गरुड हे धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील बिजासणी घाटात लपून असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून गरुडसह त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. संशयित गरुड यांना आसरा देणाऱ्या सोपान सुपडू बारी (वय 52, रा. शेंदूर्णी), पंकज माधवराव चव्हाण (वय 42, रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) आणि एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक रमीज शेख, अंमलदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी, संदीप बागल, कैलास चव्हाण, ठाकरे, देवरे, पानवळ, पालखेडे व पवार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif