शेतात फवारणी करतांना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

1

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील वरखेडी (Varkhedi) येथील एका अविवाहित अल्पभूधारक २८ वर्षीय युवकाचा शेतात पिकाला फवारणी करत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरखेडी ता. पाचोरा येथील अविनाश अशोक भोई (वय २८) यांची वरखेडी शिवारात एक एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे दि. ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करत असतांना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतानाच दि. १ आॅगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अविनाश हा त्यांच्या कुटुंबियातील कर्ता युवक असल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अविनाश भोई यांच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, तीन बहिणी असा परिवार असुन अविनाशच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

1 Comment
  1. अविनाश भोई यांनी कोणत्या पिकावर औषध फवारणी केली आणि ते औषध कोणत्या दुकानातून आणि कोणत्या कंपनीचे घेतलं होतं याची माहिती घ्या आणि ती माहिती घेऊन आम्हाला तत्काळ ९४२२५१७०४४ किंवा ७८८७३१३३११ क्रमांकावर व्हाट्सअप करून कळवा.
    अविनाश भोई या शेतकऱ्यांच्या परिवाराला योग्य तो न्याय मिळवून देण्यामध्ये मदत होईल.
    पुढील सर्व कामकाज शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष व जळगाव शाखा करेल.
    सदरची माहिती व बातमी आम्हाला आमच्या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र काबरा यांच्याकडून मिळालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.