Sunday, May 29, 2022

हृदयद्रावक घटना.. ६ महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक (सातपूर) ;६ महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर बंदा वणे मळा परिसरात एका लहानशा खोलीत राहणाऱ्या सिंग कुटुंबाच्या सहा महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय.

- Advertisement -

सहा महिन्याचा मुलगा श्रीरिष खेळत खेळत बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीत पडल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बंदावाणे मळा परिसरात राहणाऱ्या राकेश भिका सिंग यांचा लहान मुलगा श्रीरिष हा सकाळी उठल्यावर घरातील खोलीत असलेल्या बाथरुम मध्ये गेला.

खेळता खेळता प्लास्टिकच्या बादलीतील पाण्यात पडला आणि काही वेळाने घरातील लोकांना हा प्रकार समजला असता त्यांनी अस्ताव्यस्त अवस्थेत श्रीरीष ला त्वरित रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

श्रीरिष याला काही दिवसांपूर्वी नेपाळ वरून उपचारासाठी नाशिक ला आणले होते. येथील उपचाराने त्याला बरे देखील वाटले होते मात्र काळाने त्याचा घात केला लहान बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या