कंटेनर डीपीवर आदळले; विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील खेडी परिसरातील पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने डीपीला वाहन धडकल्याने विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालक आज गाडी रिव्हर्स घेत असतांना त्याला अंदाज न आल्याने मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीवर जाऊन आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान परिसरातील लोकांनी सावधगिरी बाळगून चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. चालकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आला असून याबाबत पंचनामा सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.