Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    अपघात

    पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला

    तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार : सरकारला धक्का
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments259 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका करत आहे. मात्र, त्यांना मध्यस्थी करण्यात अपयश मिळाले. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीमेवर प्रचंड तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानमध्ये केला. त्यामध्येच आता अजून एक खळबळ उडवणारी बातमी पाकिस्तानमधून येत आहे.

    शनिवारी पाकिस्तानमधील बन्नू येथे झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याने पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा हादरली आहे. मोठा बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर लगेचच पाकिस्तानी पोलिसांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 15 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की, हा हल्ला अफगाण सीमेजवळील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या बन्नू जिल्ह्यात झाला.

    या हल्ल्यात थेट पोलिस स्टेशनला टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाने भरलेली गाडी पोलिस स्टेशनच्या जवळ उडवण्यात आली. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, काहीच शिल्लक राहिले नाही. मोठे नुकसान झाले. पोलिस अधिकारी सज्जाद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी 15 पोलिस अधिकारी ड्यूटीवर होते आणि काही कर्मचारी देखील.

    कार पहिल्यांदा एका गेटवर आदळली आणि त्यानंतर धमाका झाला. काही सेकंदामध्ये सर्वकाही संपले. हा मोठा स्फोट झाल्यानंतर काही पोलिस कर्मचारी मदतीकरिता पुढे आले. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हेच नाही तर असाही दावा केला जात आहे की, या हल्ल्याकरिता ड्रोन चा देखील वापर करण्यात आला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, आजुबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले.

    पाकिस्तानमध्ये झालेला हा मोठा हल्ला म्हणावा लागेल. या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून अधिक माहिती देण्यात आली नाहीये. काही दिवसांपूर्वी अत्यंत मोठा हल्ला पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यात 400 पेक्षा अधिक लोक ठार झाली होती. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानकडून हा हल्ला एका रूग्णालयावर करण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 

    June 9, 2026

    डोंगरगाव येथे ३५ वर्षीय तरुणीची गळफास

    June 4, 2026

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif