Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»एलपीजीच्या ई-केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढली!
    लोकार्थ

    एलपीजीच्या ई-केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढली!

    ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत : घरबसल्याही करता येणार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 19, 2026No Comments413 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत आता १६ ऑगस्टवरून २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांची अजूनही ई-केवायसी झालेली नाही, त्यांना आता काही दिवस वाढवून दिले आहेत.

    ई-केवायसी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक एकाच वेळी प्रयत्न करत असल्याने एलपीजी कंपन्यांच्या अॅपवर तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाउन आणि प्रोसेस मध्येच थांबवण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी गॅस एजन्सींमध्येही ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. या अडचणी लक्षात घेऊन मुदत वाढवण्यात आली आहे.

    ज्या ग्राहकांनी आधीच ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली आहे. त्यांना पुन्हा प्रोसेस करण्याची गरज नाही. आपल्या ई-केवायसी ची स्थिती संबंधित एलपीजी कंपनीच्या अधिकृत अॅपवर किंवा गॅस एजन्सीकडून तपासता येईल.

    महत्त्वाचं म्हणजे, मुदतीपर्यंत ई-केवायसी न केल्याने गॅस कनेक्शन तात्काळ बंद किंवा रद्द होईलच असं नाही. मात्र सरकारी एलपीजी सब्सिडीवर परिणाम होऊ शकतो आणि ग्राहकाला सिलेंडर विनासबसिडी घ्यावा लागू शकतो. एलपीजी ग्राहकांना घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप वापरता येईल.

    अशी करा प्रोसेस..

    १. अधिकृत एलपीजी अॅप डाउनलोड करून कनेक्शनशी संबंधित मोबाइल क्रमांकाने लॉगिन करा.
    २. ई-केवायसी किंवा आधार अपडेट पर्याय निवडा.
    ३. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
    ४.आधार आधारित Face Authentication प्रोसेस पूर्ण करा.
    ५. प्रोसेस यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर KYC पूर्ण झाल्याचा मेसेज दिसेल. काही प्रकरणांमध्ये SMS च्या मदतीनेही माहिती मिळवू शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात फेरबदल

    September 2, 2026

    प्रगत काष्ठ प्रक्रिया केंद्रातून महिलांच्या आत्मनिर्भरतेला नवे बळ!

    August 25, 2026

    कांदा महागल्याने घराचे बजेट कोलमडले

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif