Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली
    कृषी

    पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली

    31 जुलै ऐवजी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ : कृषी विभागाची माहिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments190 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत होती. पण तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आला नव्हता. त्यांच्यासाठी या योजनेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तर अल निनोचे संकट पाहता अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्या शेतकऱ्यांनी pmfby.gov.in या साईटवर जाऊन अर्ज भरावा. अथवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत अर्ज करावा. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी PMFBY Crop Insurance ॲपवर अर्ज करता येईल. कृषी विभागाने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

    आतापर्यंत राज्यातील 61 लाख 82 हजार 218 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अधिकृत नोंदणी केलेली आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना अर्ज करायचा होता. पण साईट स्लो होणे, इतर तांत्रिक अडचणी, इंटरनेटचा गतिरोध आणि इतर कारणांमुळे अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. सरकारने या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्यांना अजून आठ दिवस अर्ज करण्यासाठी अतिरिक्त मिळणार आहेत.

    राज्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर विभागातून 13 लाख 25 हजार, लातूर विभागातून 2 लाख 42 हजार 826, कोकण विभागातून 1 लाख 2 हजार 335, नाशिक विभागातून 3 लाख 33 हजार 385, पुणे विभागातून 6 लाख 7 हजार 663, कोल्हापूर विभागातून 2 लाख 40 हजार 253, अमरावती विभागातून 6 लाख 91 हजार 973 आणि नागपूर विभागातून 4 लाख 53 हजार 383 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. एकूण 61 लाख 82 हजार 218 शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.

    तर राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहु नये यासाठी राज्य सरकार लक्ष ठेवून असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेत अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीची लाभ घेण्यात विलंब करू नये असे कृषिमंत्री म्हणाले. अल निनोचे संकट पाहता त्यांनी 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या योजनेत कोणतेही पात्र शेतकरी वंचित राहायला नको यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif