Tuesday, November 29, 2022

खळबळजनक : राणेंच्या फार्म हाऊसजवळ ऑडीत आढळला मृतदेह

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) एका वाहनात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसजवळ लाल रंगाच्या ऑडी (Audi) कारमध्ये मृतदेह (Dead body in car) आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला.

- Advertisement -

- Advertisement -

दोन दिवसांपासून मृतदेह गाडीमध्ये

पनवेलमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कारमध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असता तो संजय कार्ले (Sanjay karle) नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह ऑडी कारपर्यंत कसा पोहोचला याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हा मृतदेह गाडीमध्ये असल्याची माहिती आहे.

गोळ्या झाडून हत्या

दरम्यान महामार्गावर उभ्या असलेल्या आलिशान कारमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृताच्या छातीवर आणि पोटावर गोळ्यांच्या खुणा होत्या.

मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

रस्त्याच्या कडेला उभी असणारी लाल रंगाची ऑडी पुण्याची असल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी लॉक होती, यामुळे पोलिसांना यामधील मृतदेह काढताना अडचणी आल्या. मात्र एक्सपर्डच्या मदतीने गाडीचे दरवाजे उघडून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यामधील मृत व्यक्तीचे नाव संजय कार्ले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले आहे.

व्यक्ती पुण्यातील गुन्हेगार

हत्या झालेली व्यक्ती ही पुण्यातील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. संजय कार्ले असे त्याचे नाव आहे. आता हा मृतदेह येथे कोणी आणून टाकला, तसेच खूनी कोण आहेत याचा सविस्तर तपास पोलिसांकडून केला जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या