Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोपड्यात दिवसा घरफोडी; लाखांचा ऐवज लंपास
    गुन्हे वार्ता

    चोपड्यात दिवसा घरफोडी; लाखांचा ऐवज लंपास

    सुदर्शन कॉलनीतील घटना : रोकड, सोने-चांदीचे दागिने पळविले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026No Comments237 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्यांनी घरातून रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रामकृष्ण महाजन (वय 33, रा. प्लॉट क्रमांक 31, सुदर्शन कॉलनी, यावल रोड, चोपडा) यांनी याबाबत तक्रार दिली. दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.50 ते 10.45 या वेळेत त्यांनी घराला कुलूप लावून पत्नीला क्लासला सोडण्यासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

    बेडरूममधील कपाटाचे लॉकर फोडून त्यातील 2 लाख रुपये रोख रक्कम, सुमारे 52 हजार रुपयांचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच काही चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) व 331(3) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif