शपथविधीची तारीख निश्चित : बावनकुळे यांनी दिली माहिती

..तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावली असती : कुणी केला आरोप?

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. मित्रपक्षासह बहुमताचा आकडा जवळ केला. त्यातच मुख्यमंत्री पदावरून, खाते वाटपावरून मित्र पक्ष नाराज असल्याच्या चर्चा जोर घेत आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून गावी आहेत. अशातच भाजपाने राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होईल असे जाहीर केले. काही राजकीय निरीक्षकांच्या मते हा एकनाथ शिंदे यांना थेट मॅसेज आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय लवकर कळवावा, अशी ही रणनीती असल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून बावनकुळे यांना टोला लगावला आहे. भाजपचे प्रांत अध्यक्ष सांगत आहेत की पाच तारखेला शपथविधी होणार आहे. हे काय राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का?, असा सवाल थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे. राज्यपालांनी यांना सांगितलं आहे का? राज्यपाल यांनी कळविले आहे का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला तयार नाही का घाबरले आहात का? याला सर्वस्वी जबाबदार डी वाय चंद्रचूड आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

शिंदेंचं सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललं आहे. जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून महाराष्ट्र असेल, संबळचा विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशांमध्ये एका प्रकारची आग लावली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं तर डी वाय चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजी वाहू सरकार आहे केअरटेकर गव्हर्मेंट हे देखील संविधानाच्या खिलाफ आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

26 तारखेला या सरकारची, 14 व्या विधानसभेची मुदत संपलेली आहे. विधानसभेची नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. पण त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील… आम्ही जर असतो. आमचं सरकार असतं तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावली असती हे मी वारंवार सांगतो, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून आठ दिवस होऊन गेले. यांना एवढं बहुमत आहे, यांनी निकालानंतर 24 तासात सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप यांच्या कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? यांच्याकडे बहुमत आहे ना… मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष इतका मोठा नेते इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.