Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; पाच दरोडेखोर जेरबंद!
    ताज्या बातम्या

    मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; पाच दरोडेखोर जेरबंद!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2025Updated:October 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; पाच दरोडेखोर जेरबंद!

    रोख रक्कम आणि शस्त्रांसह आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई

    मुक्ताईनगर | प्रतिनिधी 
    जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर दरोडेखोरांनी कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंपावरही लूटमार केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर चोरले आणि एकूण १ लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

    अटक आरोपींची नावे:
    सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्‍हाणपूर, म.प्र.)
    पंकज मोहन गायकवाड (वय २३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ)
    हर्षल अनिल बावस्कर (वय २१, बाळापूर, जि. अकोला)
    देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, बाळापूर, जि. अकोला)
    प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला)

    पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपये रोख, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळी सॅक बॅग जप्त केली आहे.

    गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई: जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे आणि ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी चार आरोपींना नाशिक येथून, तर एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अकोल्यातून ताब्यात घेतले.

    मुख्य आरोपीचा गुन्हेगारी इतिहास: मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगल यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, २०२४ मध्ये त्याला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

    या यशस्वी कारवाईमुळे मुक्ताईनगर, भुसावळ आणि परिसरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #LCB #muktainagar jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif