Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»मुंबईत धोकादायक दुधाचा सुळसुळाट
    आरोग्य

    मुंबईत धोकादायक दुधाचा सुळसुळाट

    ११ हजार लिटर दूध जप्त : एफडीएची कारवाई
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 9, 2026No Comments305 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मुंबईमध्ये एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मोठी कारवाई केली. ११ हजार लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आले. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी येथे एफडीएने कारवाई केली. एकूण १९५ दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्या आले आहेत. १८८ नमुने सुरक्षित असून ६ निकृष्ट तर १ नमुना धोकादायक आढळून आला. त्यानंतर एफडीएने ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट केले. एफडीएकडून मुंबईत येणाऱ्या दूध वाहतूक वाहनांची टोलनाक्यांवरच तपासणी केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनने मुंबई आणि उपनगरांमध्ये विशेष तपास मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मुंबईत येणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रमुख टोलनाक्यांवर तपासणी करण्यात आली. ही मोहीम रात्रीच्या वेळेत राबवण्यात आली. मुलुंड (आनंद नगर), मुलुंड (LBS रोड), ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी या सहा प्रवेश ठिकाणी अन्न व औषध प्रशासनच्या पथकांनी तपासणी केली.

    तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एकूण १९५ दुधाचे नमुने घेतले. त्यापैकी १८८ नमुने सुरक्षित आढळले, ६ नमुने निकृष्ट दर्जाचे होते तर १ नमुना आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळले. तसेच पुढील कारवाईसाठी आणखी ७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. या कारवाईत एकूण ११,०८०.५ लिटर दूध जप्त करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे दूध सील करून उत्पादकांकडे परत पाठवण्यात आले. तर सुमारे ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट करण्यात आले.

    अन्न व औषध प्रशासनने सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहतील. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी नागरिकांना संशयास्पद किंवा असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.