Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वरणगावला नुकसानग्रस्त भागाची मंत्री , जिल्हाधिकारी , महसुल विभागाकडून पाहणी
    जळगाव

    वरणगावला नुकसानग्रस्त भागाची मंत्री , जिल्हाधिकारी , महसुल विभागाकडून पाहणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025Updated:September 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगावला नुकसानग्रस्त भागाची मंत्री , जिल्हाधिकारी , महसुल विभागाकडून पाहणी

    पडझड झालेल्या घराचे तात्काळ पंचनामे ; मंत्री सावकारे यांनी दिले मदतीचे आश्वासन

    वरणगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरासह परिसरात मंगळवार रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीला पूर आल्याने किणाऱ्या वरील दुकानात पाणी शिरून तर घराची पडझड होऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय सावकारे , जिल्हाधिकारी व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करीत पंचनाचे करण्याचे काम सुरू केले

    गेल्या दोन दिवसांपासून वरणगाव ,सुसरी , पिंपळगाव , आचेगाव , तळवेल , दर्यापूर , अजनसोंडे , तपतकठोरा या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे शेतातील मका , कपाशी , ज्वारी , उडीद , सोयाबीन , या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आचेगाव , सिध्देश्वर नगर , आणाभाऊ साठे नगर , डॉ बाबासाहेब आबेडकर नगर , विकास कॉलणीत पावसाने घराची पडझड होऊन नुकसान झाले तर यात वृध्द महिलांना सह दोन बालके जखमी झाले तर भोगावती नदीला पूर येऊन भवानी माता मंदिराच्या समोर असलेल्या दुकानात पाणी शिरून नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी भुसावळचे आमदार व मंत्री ना संजय सावकारे , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपविभागीय दंडअधिकारी जितेंद्र पाटील , जिल्हा परिषद मुख्यधिकारी मिनल करणवाल तहसिदार निता लबडे , मंडळधिकारी रंजनी तायडे , तलाठी रेणुका पाटील यांच्या ताफ्याने नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करीत पंचनामे करण्याचे आदेश मंत्री सावकारे यांनी दिले

    मंत्री सावकारे यांचे अश्वासन

    शहरातील विकास कॉलणी परिसरातील नबाबाई धनगर , डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील दिपक भैसे , आण्णाभाऊ साठे नगर मधील शामराव पेटारे , सिध्देश्वर नगर मधील समाधान रामदास वडार व आचेगाव येथील धनराज तायडे घराची पडझड होऊन नुकसान झाल्याने त्यांची पाहणी करीत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन मदतीचे आश्वासन दिले

    भोगावती नदी पात्रातील अतिक्रमण हटणार ?

    भोगवती नदी पात्राच्या परिसारात ग्रामपंयतीच्या कार्याकाळात शासनाच्या परवानगीने सुशक्षीत बेरोजगारासाठी संकुलाणाची उभारणी केली होती तर नागरिकांनी गुरा ढोरासाठी जागा साभाळली असुन स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे मोठा पुर जर आला तर या परिसरात पाणी जाऊन नुकसान होत असल्याने हे नदी पात्रातील साफ सफाई करण्याचे व अतिक्रमण काढण्याचे मैखीक आदेश मंत्री सावकारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्याने या परिसरातील अतिक्रमण हटणार ? अशी चर्चा जोर धरू लागली आहे तर शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमाणाचे काय असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित करीत आहे

    शासना कडून मदतीची शेतकऱ्याना अपेक्षा

    अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे वरणगाव व परिसरातील शेतकऱ्याचे शेतातील पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने तात्काळ यांचे पंचनामे करून करून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहेयावेळी उप विभागीय दंड अधिकारी जितेंद्र पाटील , जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल , तहसिलदार निता लबडे , मंडल अधिकारी रजनी तायडे , तलाठी रेणुका पाटील हे उपस्थित होते

    jalgaon Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif