skindinavia coupon 2014 bissell pawsitively clean coupons walgreens pharmacy transfer coupon july 2013 free subutex coupons
Monday, December 5, 2022

धक्कादायक; मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार…

- Advertisement -

 

- Advertisement -

बाडमेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

देशात बलात्काराच्या घटना काही केल्या कमी होतांना दिसत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाडमेर जिल्ह्यात मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार (Dalit girl gang-raped) झाल्याची घटना समोर आली आहे. नराधमांनी मुलीला बोलेरो कारमधून नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या वडिलांनी धोरीमन्ना पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि सांगितलं की, आमची मूकबधिर मुलगी संध्याकाळी एमआरटी रोडजवळील शेतात शेळ्या चारत होती. यादरम्यान बोलेरो कारमधून आलेल्या नराधमांनी मुलीचा गळा दाबून तिला जवळच्या वनविभागाच्या परिसरात नेलं आणि तिथं नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडताच नराधम तेथून पळून गेले.

पीडित मुलगी घरी न पोहोचल्यानं नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत मुलगी वनविभागाच्या परिसरात नातेवाईकांना आढळली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला धोरीमन्ना येथील सामूदायिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी रात्री उशिरा पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भार्गव यांनी सांगितलं की, पीडितेची आज मेडिकल तपासणी केली जाईल. यासोबतच श्वानपथकासह पोलिस पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. अज्ञात नराधमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक कार्यरत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या