किशोर मेढे यांच्या “दलित भारत” ग्रंथास राज्य सरकारचा साहित्य, संस्कृती विभागाचा पुरस्कार…

0

 

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

काल दि २७ रोजी राज्य शासनाच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने” मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र राज्य अनु.जाती, जमाती आयोगाचे सदस्य सचिव किशोर मेढे यांच्या “दलित भारत” ग्रंथास राज्य सरकारच्या साहित्य आणि संस्कृती विभागाच्या वतीने एक लाख रुपये व सन्मान पत्र देऊन दिपक केसरकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दरम्यान किशोर मेढे यांना लेखनाची खूप आवड असून ‘अस्तित्वाचे आकाश’ हा कवितासंग्रह तसेच ‘दर्पण’ हा अनुवादित कविता संग्रह २०१२ मध्ये प्रकाशित झाला. तसेच ‘इमरोज’ यात गुलदार, जावेद अख्तर, निर्मला पुतुल यांच्या हिंदी-इंग्रजी कवितांचा अनुवाद आहे. ‘इमरोज’ यांच्या ‘जशन जारी हैं’ या हिंदी कवितांचा मराठीत अनुवाद आहे. या कवितांचा मराठीत अनुवादास राज्यस्तरीय २०१२-१३ या बाह्यकवी पुरस्कार प्राप्त झाला. दरम्यान सध्या ते महाराष्ट्र राज्य अनु. जाती,जमाती आयोगाचे सदस्य सचिव पदावर कार्यरत आहे. किशोर मेढे यांचा झालेल्या सन्मानाने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.