कॅफे स्टाईल मलईदार हॉट आणि कोल्ड डालगोना कॉफी

0

खाद्यसंस्कृती विशेष 

आज मूड कॉफी पिण्याचा झाला, मग करुयात का कॉफी! यात तर बरेच ओप्शन्स आहेत, ब्रू, इन्स्टंट, हॉट, कोल्ड.. आणि हे तर आपल्या ओळखीतलेच आहेत, पण याच्याही पुढे अजुन व्हरायटी आहेत बरं.

फ्रॅप्रे, मोचा, कॅपेचीनो, डालगोना आणि बरेच काही.. नाव सुद्धा घ्यायला जमत नाही इतकी यादी आहे या कॉफीची आणि आपण या कॉफी घरीच बनवणार आहोत.

काही अवघड नाही.. मी शिकवेण तुम्हाला ह्या महागड्या कॉफी, अगदी झटपट आणि CCD (CAFE COFFEE DAY) मध्ये मिळतात तशा..

डालगोना 

आज सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असलेली ही डालगोना मी खूपदा केली. दक्षिण कोरियामध्ये प्रचलित असलेली ही डालगोना कॉफी आपल्याकडे लाॅकडाउनच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झाली. टिकटॉकच्या माध्यमातून #dalgonnacoffeechallenge द्वारे आज घरघरात डालगोना कॉफी प्रसिद्ध झाली.

साहित्य :

३ चमचे कॉफी (कोणत्याही ब्रँडची चालेल), ३ चमचे साखर, ३ चमचे गरम पाणी, १ ग्लास दूध, (उपलब्ध असल्यास चोको चिप्स, कोको/काॅफी पावडर)

कृती :

१) प्रथम पाणी गरम करून घ्यावे.

२) कॉफी, साखर, आणि गरम पाणी सम प्रमाणात 3/3/3 चमचे घेऊन ते चांगले फेटून घ्यावे. (एग बिटर किंवा ब्लेंडर मशीनच्या सहाय्याने फेटून घ्यावे.)

३) गरम दुधात साखर घालून वरतून फेटलेले कॉफीचे मिश्रण ओतावे.

४) गार्नीशींगसाठी वरतून चोको चिप्स आणि कोको/काॅफी पावडर घालावी.

हॉट डालगोना कॉफी 

१ ग्लास कोमट दुधात साखर घालून वरतून फेटलेल्या कॉफीचे मिश्रण घालून डेकोरेशनसाठी चॉकलेटचे तुकडे किंवा चोको चिप्स टाकून सर्व्ह करावी.

कोल्ड डालगोना कॉफी

१ ग्लास थंड दूधामध्ये साखर घालून, दोन -चार बर्फाचे खडे घालावे व वरतून फेटलेल्या कॉफीचे मिश्रण घालावे व वरतून चॉकलेट सॉस घालून किंवा विप क्रिम घालून सर्व्ह करावे.

वा.. मस्तच अशी फेसाळलेली गरम गरम कॉफी, क्या बात है..

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

फुड ब्लॉगर, मुंबई 

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.