दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दहिगाव येथील अरुण जंगलू अत्तरदे यांचे चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण प्लॉट भागालगतच्या खळ्याला आज दुपारी साडेतीन वाजेची सुमारास अचानक आग लागली. यामध्ये गुरांसाठीचा चारा, कुट्टी, लाकूड, शेती उपयोगी अवजारे, ठिबक सिंचनचे पाईप या वस्तू जळून खाक झाले. अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आग लागता क्षणी जवळच असलेल्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पंपाच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्राथमिक प्रयत्न करण्यात आले, तर यावल येथील नगरपालिकेचा अग्निशामक पंप बोलवून ती विझवण्यात आली. गावकऱ्यांच्या सहाय्याने आग आग वाढण्याचा धोका टळून पुढील अनर्थ टळला.

Leave A Reply

Your email address will not be published.