रांगोळी मन, बुद्धी व चित्ताचं पावित्र्य राखते : दादा महाराज

रुचिका कुळकर्णी, रुचिका नाईक प्रथम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रांगोळी ही 64 कलांपैकी एक असून रांगोळीमुळे मन, बुद्धी व चित्ताचे पावित्र्य राखले जाते. नैराश्याच्या निवृत्तीसाठी कला असते असे प्रतिपादन चिमुकले राम मंदिर संस्थानचे हभप दादा महाराज जोशी यांनी केले. राष्ट्र सेविका समिती व भगिनी मंडळाच्यावतीने दीपावली निमित्ताने आयोजित ऑनलाईन ठिपक्यांच्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.

श्री. दादा महाराज पुढे म्हणाले की, रांगोळीमुळे घर संस्कारी आहे असे दिसते, रांगोळी घराला सौंदर्य देते. घराची सजावट रांगोळीशिवाय अपूर्ण आहे. दारात रांगोळी पाहिल्यावर आलेल्या माणसाला प्रसन्न वाटते. समाजातील निराशा दूर करण्यासाठी दिव्यात तेल टाकावे लागेल अर्थात समाजाला जागृत करावे लागेल आणि आपल्या उपक्रमाने तेच केले आहे असेही ते म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृषाली तोंडापुरकर यांनी पद्य सादर केले. विंदा नाईक यांनी प्रास्ताविक तर सीमा नेवे यांनी दादा महाराजांचा परिचय करून दिला. आदिती कुळकर्णी यांनी सूत्र संचालन केले. यशस्वी स्पर्धकांना दादा महाराजांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

 

डॉ. कुमुद नारखेडे यांनी परीक्षण केले. स्पर्धेचा निकाल – शालेय व महाविद्यालयीन गट- प्रथम – रुचिका कुळकर्णी, द्वितीय मानसी भट, तृतीय भार्गवी नांदेडकर, उत्तेजनार्थ – पल्लवी ओसरे खुला गट प्रथम – रुचिका नाईक, द्वितीय – अंकिता शेंडे, तृतीय शुभांगी जोशी उत्तेजनार्थ – सरिता नेवे व शुभांगी येवले.

Leave A Reply

Your email address will not be published.