चक्रीवादळाचा धोका: जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

मेंडोस चक्रीवादळाने (Cyclone Mandous) तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) थैमान घातले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळाचा फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार (Nandurbar), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar), पुणे (Pune) आणि मराठवाड्यातील (Marathwada) औरंगाबाद (Aurangabad), जालन्यात (Jalna) मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने माहिती आहे.

दाक्षिण-पूर्व अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, किनारपट्टी जवळ आज सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. राज्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाउस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह जोरदार वारे ही वाहण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणी दर्शविल्या प्रमाणे आज, उद्या गडगडाटासह हलका/मध्यम पावसाची शक्यता आहे.

केरळ आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत मंगळवार दि. 13 रोजी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. तर आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज दि. 14 रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच उद्यापासून दि. 15 रोजी किमान तापमानात 3 ते 5 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

तापमानात कमी नोंद

मागच्या 24 तासांत पुणे 28.6 (20.1), जळगाव 30.6 (21.5), धुळे 31.0 (18.5) कोल्हापूर 27.7 (22.0), महाबळेश्वर 22.0 (16.2), नाशिक 28.8 (19.9), निफाड 30.2 (10.5), सांगली 27.7 (21.8), सातारा 28.9(22.0), सोलापूर 30.2 (22.2), सांताक्रूझ 34.2 (25.4), डहाणू 34.2 (23.2), रत्नागिरी 32.0 (25.3), औरंगाबाद 28.2 (17.7), नांदेड 29.0 (21.6), उस्मानाबाद (18.4), परभणी 29.0 (21.1), अकोला 30.8 (22.3), अमरावती 29.4 (20.4), बुलडाणा 29.0 (20.0), ब्रह्मपुरी 34.2 (21.6), चंद्रपूर 30.0 (18.4) गडचिरोली 30.0 (18.4), गोंदिया 30.5 (20.0), नागपूर 30.6 (21.4), वर्धा 33.0 (22.4), यवतमाळ (18.0) अशी तापमानाची नोंद झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.