Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर
    हवामान

    पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर

    भारतातही हवामान बदलणार : मात्र थेट परिणाम...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments436 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जगावर मैला चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे, यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. हे वादळ एखाद्या देशाच्या किनाऱ्याला धडकल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना भारतीय हवामान विभागाने सविस्तर माहिती दिली आहे.

    भारतीय हवामान विभागाने मैला चक्रीवादळाबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की हे चक्रीवादळ भारतापासून खूप दूर आहे. असं असलं तरीही देशातील काही भागांमध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. दक्षिण भारतात वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे, तसेच काही भागात उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भारताला थेट चक्रीवादळाचा धोका नसला तरी हवामान अस्थिर होण्याची शक्यता आहे.

    मैला हे घातक चक्रीवादळ सध्या पॅसिफिक महासागरातील सोलोमन समुद्राच्या भागात सक्रिय आहे. ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांच्या दरम्यान तयार झालेले चक्रीवादळ घातक ठरण्याची शक्यता आहे. याला श्रेणी 3 किंवा 4 चे चक्रीवादळ मानले जात आहे. या वादळाच्या आसपास वाऱ्याचा वेग सुमारे 195 किमी प्रति तासपर्यंत पोहोचत आहे. मात्र हे भारतापासून हजारो किलोमीटर दूर असल्याने भारतीय किनाऱ्यांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाही.

    दिलेल्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुढील काही दिवसांत कोणतेही चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता नाही. याचाच अर्थ भारताच्या सागरी किनाऱ्यांना या वादळाचा फारसा धोका नाही. असं असलं तरी हवामान पूर्णपणे शांतही नाही, कारण इतर स्थानिक प्रणाली सक्रिय आहेत.

    9 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. या भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे. हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 ते 44 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026

    सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif