आश्चर्य : गेल्या 50 वर्षांत प्रथमच जमिनीतून चक्रीवादळ
समुद्रात माजवणार धुमाकूळ : पाकिस्तानने दिले...
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होत असतात. त्यानंतर ते जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रकार झाला आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता त्याचा परिणाम समुद्रात दिसणार आहे. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याला ‘आसना’ (ASNA) हे नाव दिले आहे. ‘आसना’मुळेच गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतीवृष्टी झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने कच्छमधील खाडीवरील जमिनीत चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली. या चक्रीवादळास ‘आसना’ हे नाव दिले आहे. पाकिस्तानने हे नाव दिले आहे. गेल्या 50 वर्षांत चक्रीवादळ समुद्राच्या किनारी असलेल्या जमिनीवर तयार झाल्याचे हे पहिले उदाहरण आहे. हे चक्रीवादळ आता समुद्राच्या दिशेने जात आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, ‘आसना’ चक्रीवादळ 1944, 1964 आणि 1976 मध्ये आले होते. यापूर्वी 1976 मध्ये ओरिसामधील जमिनीवर चक्रीवादळ आहे. 1944 मध्ये आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. त्यानंतर 1964 मध्ये चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झाले होते.
“जमिनीवर चक्रीवादळ तयार होण्याची घटना दुर्मिळ आहे. यापूर्वी अशी घटना 1976 मध्ये झाली होती. नेहमी समुद्रात चक्रीवादळ तयार होते अन् जमिनीवर थांबते. परंतु आता त्याच्या उलट झाले आहे.”
अशोक कुमार दास, अहमदाबाद आयएमडी शास्त्रज्ञ
आयएमडीने म्हटले आहे की, गुजरात आणि पाकिस्तानमधील कच्छजवळील भागात आणि ईशान्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या ‘खोल दाब’मुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे 6 किमी/तास वेगाने पश्चिमेकडे अरबी समुद्रात सरकले आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाला ‘आसना’ असे नाव दिले आहे. ते पुढील दोन दिवस भारतीय किनारपट्टीपासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रावर अंदाजे पश्चिम-वायव्य दिशेने सरकत राहील.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनीही एक्सवर ट्विट लिहीत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, उत्तर अरबी समुद्रावर झालेला बदल पाहून आश्चर्य वाटते. या महिन्यात उत्तर अरबी समुद्र थंड असतो हे आपल्याला नेहमीच माहीत आहे. परंतु आता येथे चक्रीवादळ तयार झाले. म्हणजे हा भाग गरम आहे. जे ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक पातळीवर वाढत्या तापमानाचा परिणाम आहे.