Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!
    गुन्हे वार्ता

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 9, 2026No Comments827 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    सायबर गुन्हेगारांनी आता शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. धानोरा येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत तब्बल 1 लाख 96 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

    धानोरा येथील शेतकरी दीपक रोहिदास साळुंखे (वय 35) यांच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने दि. 7 ऑगस्ट रोजी 98 हजार रुपये, तर त्यानंतर दि. 8 ऑगस्ट रोजी पुन्हा 98 हजार रुपये, अशा दोन व्यवहारांत एकूण 1 लाख 96 हजार रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर साळुंखे यांनी तत्काळ याबाबतची माहिती घेतली.

    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने साळुंखे यांच्या खात्यातील रक्कम हडपल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. सलग दोन दिवस प्रत्येकी 98 हजार रुपयांचे व्यवहार झाल्याने या प्रकारामागे नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

    या प्रकरणी साळुंखे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे पथक तपास करीत आहे. संशयिताने कोणत्या माध्यमातून खात्यात प्रवेश मिळविला, व्यवहार कोणत्या खात्यात किंवा माध्यमातून करण्यात आले आणि या फसवणुकीमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्यात येत आहे.

    ग्रामीण भागही सायबर भामट्यांच्या रडारवर

    मोबाईल, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि विविध ऑनलाईन सेवांचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रकार ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहेत. पूर्वी सायबर फसवणुकीचे प्रकार प्रामुख्याने शहरांमध्ये घडत असल्याचे चित्र होते; मात्र आता गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य खातेदारांनाही सायबर भामटे लक्ष्य करीत आहेत. या घटनेने ग्रामीण भागातील बँक खातेदारांनी ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करून ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, यूपीआय पिन अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यास ती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif