bourbon french parfums coupon green giant valley selections coupon yankee candle williamsburg va coupon bath and body works printable coupon july 2012 invullen belastingaangifte 2012 diest
Monday, December 5, 2022

तरूणीला व्हॉट्सॲपवर पाठवले अश्लिल मॅसेज; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील राहणाऱ्या तरूणीला व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ती आपला उदरनिर्वाह करते. १३ जुलै रोजी रात्री जेवण करून झोपलेली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. त्यानंतर अश्लिल फोटो व्हॉटसॲपवर पाठविले.

यासंदर्भात गुरूवार १४ जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या