Tuesday, May 24, 2022

अश्लिल फोटो टाकून तरूणीची बदनामी; गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अज्ञात व्यक्तीने जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचे मोबाईलवरून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

सदर २८ वर्षीय तरूणी ही जळगाव शहरात एका भागात आपल्या कुटुंबियांसह राहते. २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबरवरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लिल व धमकीचे मेसेज टाकले. त्याचप्रमाणे तरुणीचे अश्लील फोटो तयार करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या