Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिक्षकाला १५ लाखात गंडवले
    जळगाव

    शिक्षकाला १५ लाखात गंडवले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 20, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आजकाल अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष देत लोकांना गंडवले जात आहे. अशाच प्रकारे एका शिक्षकाला देखील फसवण्यात आले आहे.

    जळगाव शहरातील प्रेमनगर परिसरात राहणारे शिक्षक जयेश अरविंदकुमार मेहता (वय ४९) यांची फसवणूक झाली आहे. मेहता यांच्याशी २२ फेब्रुवारीला २ जणांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे सांगत आमिष दाखविले. यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. यावर शिक्षकाने देखील विश्वास ठेवला.

    दरम्यान समोरच्या व्यक्तीने सांगितल्यानुसार, शिक्षकाने अँप डाउनलोड करत रजिस्ट्रेशन केले. यावर सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रकमेवर मेहता यांना २० हजार रुपयांचा परतावा देखील देण्यात आला. त्यातून मेहता यांचा अधिक विश्वास बसला. त्यामुळे शिक्षकाने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहिले. अशी साधारण १४ लाख ८३ हजार ५२५ इतकी रक्कम गुंतवणूक करून टाकली होती.

    टप्प्याटप्प्याने साधारण १५ लाख रुपये इतकी रक्कम गुंतविल्यानंतर देखील त्यांना कोणताही परतावा व मूळ रक्कम मिळाली नाही. दरम्यान रक्कम मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेश शर्मा तपास करीत आहेत.

    Cyber Crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif