Sunday, November 27, 2022

इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट; तरूणीची बदनामी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

जळगाव शहरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भुसावळ शहरातील हुडको कॉलनीत १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान तिच्या नावाने बनावट अकाउंट इंस्टाग्रामवर बनवून तरुणीची बदनामी केली.  ही गंभीर बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने नातेवाईकांना सांगितले.

दरम्यान नातेवाईकांच्या मदतीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या